Skip to content

    🎉✨ दिवाळी उत्सव आदिवासी बांधवांसोबत✨🎉

    “दोन करंजी, चार लाडू,
    चला आदिवासींशी नाते जोडू!”

    उपक्रम: स्वच्छता किट व दिवाळी फराळ वाटप
    📅 दिनांक: २० ऑक्टोबर २०२५
    📍 ठिकाण: तलवाडा, खर्डी

    नीड विकास संस्थेच्या वतीने यंदाही दिवाळीचा पहिला दिवस तलवाडा येथील १०० कुटुंबांसोबत साजरा करण्यात आला. या प्रसंगी कुटुंबांना साबण, तेल, ब्रश, टूथपेस्ट आणि सॅनिटरी नॅपकिन्स यांचा समावेश असलेले स्वच्छता किट तसेच दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.

    🏫 जिल्हा परिषद शाळेला दिवाळीनिमित्त सजावट करण्यात आली आणि मुलांसोबत फटाके वाजवून त्यांच्या आनंदात भर टाकण्यात आली. दरवर्षीप्रमाणे श्रीमती वृशाली सालवी यांनी स्वतःच्या हाताने बनवलेला चिवडा मुलांना देऊन खास मातृत्वाची ऊब दिली.

    📚 हा कार्यक्रम माजी मुख्याध्यापक श्री. देवेश सांगळे सर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. तलवाडा हा अत्यंत दुर्गम व वाहतूक सुविधांपासून वंचित भाग असूनही शिक्षक येथे अविरत परिश्रम घेऊन मुलांचे भविष्य घडवत आहेत – हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.

    🌧 पावसाळ्यात वाहणाऱ्या ओढ्यांमुळे साहित्य वितरण शक्य न झाल्याने, दिवाळीच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट देऊन मुलांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

    🙏 हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे हितचिंतक व देणगीदार यांचे हार्दिक आभार. त्यांच्या आर्थिक व मानवी पाठबळामुळेच आम्हाला अशा दुर्गम भागात आनंद आणि आशेचे दिवे प्रज्वलित करता येतात.

    ✨ नीड विकास संस्था, मुंबई ✨
    Nutrition | Education | Employment | Development

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *