दिवाळी कार्यक्रम - २०२४
दोन करंजी, चार लाडू चला आपुलकीचे नाते जोडू!!🏮
दरवर्षीप्रमाणे यंदाही नीड विकास संस्था शहापूर, आसनगाव, मुरबाड, आणि पेण या परिसरातील आदिवासी पाड्यांवरील/वितभट्टीवरील कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. आपण हि या उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करू शकता.
या दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच किशोरवयीन मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येणार आहे. यंदाची ही दिवाळी मुलींच्या आरोग्यासाठी हितकारक बनविण्याच्या दृष्टीने साजरी करण्याचा विचार करत आहोत.
आपण आम्हांला या कार्यक्रमासाठी आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात सहकार्य करू शकता.
👉 दिवाळी फराळ – रुपये 200/- प्रती कुटुंब (लाडू,करंजी,शंकरपाळी,चकली, चिवडा इत्यादी.)
👉 मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स (वर्षभरासाठी) – रुपये 400/- प्रती मुलगी
👉 शालेय साहित्य – रुपये 600/- प्रती विद्यार्थी (नोटबुक,पेन,पेन्सिल,रबर शार्पनर, पट्टी, बॅग, रंगपेटी, चित्रकला वही इत्यादी)
संस्थेचे बँक खाते पुढीलप्रमाणे:
Account Holder Name : Need Vikas Sanstha
Bank Name : HDFC Bank
Saving Account number : 08361450000136
IFSC code : HDFC0000836
Branch : Kurla West
अधिक माहितीसाठी संपर्क करा
कमलेश – 9967884480
सारिका – 9594666926
विजय – 9867230856
स्वप्नील – 9920042906
धन्यवाद!!
नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
न्यूट्रिशन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट