
🌱 निसर्ग संवर्धनाकडे एक पाऊल – वृक्षारोपण उपक्रम 🌱
दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी, आरे कॉलनी येथे नीड विकास संस्था आणि सूर्या गोल्ड क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे निसर्गाचे संवर्धन करणे व पर्यावरणाचे हानिकारक परिणाम थांबविण्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे. या माध्यमातून आम्ही पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूर्या गोल्ड क्रिएशन चे डायरेक्टर श्री. नरेशजी सर व श्री. समर सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच निसर्ग माझा या संस्थेचे सर्वेसर्वा श्री. *शंकर सुतार* व त्यांच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.
धन्यवाद!!
नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
न्यूट्रिशन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट