









उपक्रम: रेशन आणि ताडपत्री वाटप
दिनांक: ९ मे २०२५
उपक्रम: रेशन आणि ताडपत्री वाटप
ठिकाण: टेंबरे, शहापूर
९ मे २०२०५ रोजी क्षवणिक श्रध्दा कुबेर लाड याचा ९ वा वाढदिवस असल्या कारणामुळे लाड कुटूंबियांनी यावर्षी हा दिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे योजले होते. यावेळी नीड विकास संस्थेच्या मार्गदर्शनाने टेंबरे येथील वीटभट्टीवर कुटुंबासोबत हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अवकाळी येऊन गेलेल्या पावसामुळे वीटभट्टीवरील कुटुंबांचे छप्पर व अन्नधान्य याचे नुकसान झाले होते, हि गरज लक्षात घेता १२ कुटूंबांना रेशन किट्स, घरावर टाकण्यासाठी ताडपत्री तसेच मुलांना एकत्र खेळात येतील असे खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
क्षणविक साठी सुद्धा हा आगळा वेगळा असा वाढदिवस होता. तेथील मुलांसोबत क्षणविक चा वाढदिवस साजरा करून मुलांना खाऊचे देखील वाटप करण्यात आले. तसेच क्षणविकने त्या मुलांना कशाप्रकारे खेळाचे साहित्य वापरायचे आहे त्याबाद्दल हि सांगितले व त्यांच्या सोबत सर्व खेळांचा आनंद देखील घेतला. अशा प्रकारचा वाढदिवस क्षणविक ने पहिल्यांदाच साजरा केला असेल व जवळून अनुभवाला देखील. कुबेर व श्रध्दा या दोन्ही दांपंत्यांचे कौतुक करण्यासारखे आहे ज्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवस दिवशी असा निर्णय घेतला व त्याच्या मध्ये आता पासूनच सामाजिक आपुलकीची ओढ लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आम्ही संस्थेच्या वतीने लाड कुटुंबाचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या हातून असेच सामाजिक उपक्रम घडत राहोत.
तसेच या पूर्ण उपक्रमाचे समन्वय दत्ता पाटील यांनी केले आहे त्या बद्दल त्यांचे हि मनापासून आभार.
जर आपल्याला आपले आनंदाचे क्षण अशाप्रकारे सामाजिक बांधिलकी जपत साजरे करायचे असल्यास आपण आम्हांला खालील नंबर वर संपर्क करू शकता.
सारिका – 9594666926
कमलेश – 9967884480
विजय – 9867230856
स्वप्नील – 9920042906
धन्यवाद!!
नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
न्यूट्रिशन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट