




धारावी येथे मोफत दंत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर
दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त धारावी येथे मोफत दंत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर सामाजिक दंतशास्त्र विभाग शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा फायदा रहिवाश्यांनी घेतला ज्यामध्ये प्राथमिक उपचार देखील करण्यात आले.
या शिबिरासाठी श्री. गणेश मंडळ, धारावी यांनी योग्य ती व्यवस्था व आवश्यक गोष्टींची उपलब्धता करून दिली होती. त्यासाठी नीड विकास संस्था या मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करते.
तसेच सामाजिक दंतशास्त्र विभाग शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई यांच्या संपूर्ण टीम चे देखील मनापासून आभार!!
धन्यवाद!!
नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
न्यूट्रिशन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट