
दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सह्याद्री संजीवनी या ग्रुपच्या माध्यमातून “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती” निमित्ताने “माणुसकीची ऊब” या उपक्रमांतर्गत शहापूर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा दहिवली येथे टीव्ही (Smart TV), मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, प्रश्नमंजुषा व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मुलांना देण्यात आलेल्या वह्या या विशेष होत्या कारण त्याचे कव्हर पेज हे विविध गड किल्ल्यांची चित्रे छापून देण्यात आले होते; ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची माहिती मिळेल तसेच घरगुती गणपती सणाच्या वेळेस हार किंवा मिठाई न आणता शैक्षणिक साहित्य आणावे असे आवर्जून सांगणाऱ्या चव्हाण जोडप्याने हे साहित्य जमा करून येथील विद्यार्थ्यांना दिले.
तसेच लेनार्ड कातकरी वाडी येथील वीटभट्टीवर काम करत असलेल्या आदिवासी कुटुंबांना थंडीपासून बचाव व्हावा ब्लँकेट, जुने-नवीन कपडे, मुलांसाठी खेळणी व चप्पल, शैक्षणिक साहित्य, महिला मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स आणि खाऊ वाटप करण्यात आला.
दहिवली शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले तसेच काही विद्यार्थ्यांनी उत्तम भाषण देखील सादर केले. शाळेला देण्यात आलेला टीव्ही हा त्याच वेळी शाळेत लावून त्यावर विद्यार्थ्यांना सह्याद्री संजीवनी च्या कामाची माहिती देण्यात आली.
🤝 सह्याद्री संजीवनी हा ग्रुप गेल्या ४ वर्षांपासून नीड विकास संस्थे सोबत वीटभट्टीवरील कुटुंबांसाठी व शहापूर विभागातील शाळांना आवश्यक साहित्याचे वाटप करत आहेत. समाजाप्रती त्यांची असलेली जबाबदारी हा ग्रुप अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत आणि याचे आम्हांला खरचं कौतुक आहे.👍
🙏आम्ही नीड विकास संस्थच्या वतीने संपूर्ण सह्याद्री संजीवनी ग्रुपचे आणि त्यांच्या हितचिंतकांचे मनापासून आभार मानतो. कारण असे उपक्रम हे आदिवासी दुर्गम भागातील विदयार्थी व तेथील रहिवाश्यांसाठी खूप हितकारक आहेत. सुट्टीच्या दिवशी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली व उत्तम नियोजन केले त्यासाठी त्यांचे हि आभार आणि कौतुक. तसेच या संपूर्ण कार्यक्रमासाठीचे समन्वय दत्ता पाटील यांनी केले त्यासाठी त्याचे हि आभार.🙏
अशा प्रकारचे उपक्रम करण्यासाठी कृपया खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा.
सारिका – 9594666926
कमलेश – 9967884480
विजय – 9867230856
स्वप्नील – 9920042906
धन्यवाद!!
नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
न्यूट्रिशन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट