Skip to content

Project Asha – Savitribai Phule Scholarship Program 2025–26

    🌸 प्रोजेक्ट आशा - सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२५-२६ 🌸

    दिनांक : १४ सप्टेंबर २०२५
    📍 स्थळ : देवडिगा हॉल, दादर (पूर्व)

    नीड विकास संस्था’ तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सावित्रीमाई फुले शिष्यवृत्तीचे आयोजन करण्यात आले.

    सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेला त्याग, सहन केलेला तिरस्कार आणि प्रत्येक मुलीकडे घेतलेलं व्यक्तिगत लक्ष — या सगळ्यामुळे आज अनेक महिला शिक्षणाच्या प्रवासात पुढे जाऊ शकल्या. तरीदेखील आजही शहरी व ग्रामीण भागात शिक्षणापासून वंचित असलेल्या अनेक मुली आहेत. त्याच वेदनेतून या शिष्यवृत्ती उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 🎓

    ✨ यावर्षीचे विशेष उपक्रम:
    🔹 ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी कंठे परिवाराच्या सहकार्याने, लक्ष्मी कंठे यांच्या स्मरणार्थ नवीन शिष्यवृत्तीचा शुभारंभ.
    🔹 Late Smt. Narsubai Annaldasula आणि Late Shri. Venkatrao Annaldasula यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे हे सहावे वर्ष.

    या दोन्ही कुटुंबांच्या आणि इतर देणगीदारांच्या मदतीने यंदा एकूण ४५ विद्यार्थिनींना आर्थिक शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढविण्यास महत्वाची भूमिका निभावेल.

    💐 कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी:
    ▪️ श्री. भगवान केसभट (CEO व Founder – वातावरण संस्था)
    ▪️ श्रीमती. उर्मिला साळुंखे (Program Lead – अक्षरा संस्था)
    ▪️ डॉ. दिपक खाडे (Naturopathy व Counselor)
    ▪️ श्री. जयंत कंठे

    या मान्यवरांनी विद्यार्थिनींना व पालकांना शिक्षणाचे आणि करिअर निवडीचे महत्त्व पटवून दिले. विशेषतः डॉ. खाडे यांनी सायकोमॅट्रिक टेस्टद्वारे ५ विद्यार्थिनींच्या करिअर मार्गदर्शनाची जबाबदारी स्वीकारली.

    🙏 विशेष आभार:
    अन्ननदासुला परिवार, कंठे परिवार आणि इतर सर्व देणगीदार — आपल्या सहकार्यामुळे आम्ही शिक्षणाच्या या प्रवासात ४५ विद्यार्थिनींपर्यंत पोहोचू शकलो. तसेच उपस्थित मान्यवर आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येक शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार.

    🌱 नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
    Nutrition | Education | Employment | Development

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *