
जागतिक महिला दिनानिमित्ताने, दिनांक *8 मार्च 2025* रोजी महिला दिनाचे औचित्य साधून *”महिलांचा सन्मान, समाजाचा विकास”* या विचाराने प्रेरित होऊन राजमाता माॅंसाहेब जिजाऊ महिला मंडळ दहिवली, शहापूर यांच्या वतीने नीड विकास संस्थेच्या अध्यक्षा सारिका यादव*यांचा सेवाव्रती महिला 2025 व नारी शक्ती महिला मंडळ, मेघवाडी जोगेश्वरी यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.
दहिवली येथे महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नीड विकास संस्था यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच प्रमुख अतिथी सौ. शीतलताई तोंडलीकर (मा.नगरअध्यक्षा मुरबाड नगरपंचायत) या सुध्दा कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
नीड विकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही “माॅंसाहेब जिजाऊ महिला मंडळाचे” व संपूर्ण दहिवली गावकऱ्यांचे व नारी शक्ती महिला मंडळाचे व तेथील कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
विशेष आभार
श्री. दत्तात्रय पाटील, उपसरपंच दहिवली
श्री. अनिकेत तावडे, मेघवाडी जोगेश्वरी
धन्यवाद!!
नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
न्यूट्रिशन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट