📚 उपक्रम :- सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती कार्यक्रम - २०२४-२५📚
दिनांक:- १४ सप्टेंबर २०२४
स्थळ – देवदिगा हॉल, दादर पूर्व
नीड विकास संस्थेच्या माध्यमातून सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती ह्या उपक्रमाचे दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले होते. हि शिष्यवृत्ती सुरु करण्यामागील उद्देश म्हणजे इयत्ता ८ वी नंतर मुलींच्या शिक्षणामध्ये ड्रॉप आऊट होण्याचे प्रमाण हे शहरी व ग्रामीण विभागात दिसून येते. तसेच उच्च शिक्षणासाठीचा कल हि कमी दिसून येतो. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी घरातून पैसे खर्च न करण्याची वृत्ती बहुतांश कुटुंबांतून दिसून येते. याच गोष्टी ग्रामीण व शहरी विभागातील मुलींच्या शिक्षणातील अडथळे निर्माण करत असल्याचे दिसून आले. म्हणूनच हा उपक्रम संस्थेच्या वतीने प्रामाणिकपणे सुरू केला आहे.
यावर्षी Late Smt. Narsubai Annaldasula and Late Shri. Venkatrao Annaldasula व तसेच इतर देणगीदारांच्या माध्यमातून ३४ मुलींच्या शिष्यवृत्तीसाठी निधी संस्थेला उपलब्ध झाला. इयत्ता ८वी ते त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींना हि शिष्यवृत्ती देण्यात येईल असे ठरले. शिष्यवृत्तीसाठी ३४ मुलींची निवड प्रक्रियेसाठी सुरुवात झाली. संस्थेने गूगल फॉर्म च्या माध्यमातून जवळ जवळ 280 पेक्षा जास्त अर्ज स्वीकारले. त्यातून विविध निकषांच्या माध्यमातून 120 मुलींची निवड करण्यात आली. अंतिम मुलाखतींमधून ३६ मुलींची निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया सुरु असताना संस्थेच्या स्वयंसेवकांना या मुलींच्या घरातील अनेक अडचणी समजल्या, फी भरताना कशाप्रकारे पालकांना अडचणी येत आहेत हे समजले.
दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व निवड झालेल्या मुलींना व त्यांच्या पालकांना बोलावून शिष्यवृत्तीच्या चेक चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिज्ञासा शारदा मिलिंद (MSW), व दीपा पवार ( MSW, founder of Anubhuti Trust and Natinal and international Award winner) तसेच श्री व सौ सुर्वे आणि त्यांची कन्या खुशी, सौ. माधुरी मोरे, सौ. नीता अन्ननदासुला उपस्थित होते. संस्थेच्या माध्यमातून हा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. शिष्यवृत्तीची रक्कम कितीही असली तरी आताच्या परस्थितीसाठी खूप महत्वाची भूमिका बजावत आहे हे उपस्थित विद्यार्थी व पालकांकडून अभिप्रायाच्या माध्यमातून पुढे आले.
🙏 संपूर्ण अन्ननदासुला कुटुंबाचे व इतर देणगीदारांचे संस्था मनापासून आभार मानते, ज्यांच्यामुळे आम्ही ३४ मुलींपर्यंत पोहचू शकलो व त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला. संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम भविष्यात हि सुरु राहील. हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण होण्यासाठी आम्हांला सहकार्य केलेल्या सर्व शुभचिंतकांचे मनापासून आभार. आपले सहकार्य या पुढेही असेच राहावे हि विनंती. 🤝
-: विशेष सहकार्य : –
🙏Annaldasula family
🙏Shri & Smt Sanjay and Sanika Surve
🙏आमचे शुभचिंतक आणि संस्थेचे कार्यकर्ता
धन्यवाद!!
नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
न्यूट्रिशन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट