








स्मार्ट टीव्ही, खेळाचे साहित्य व खाऊ वाटप
उपक्रम: स्मार्ट टीव्ही, खेळाचे साहित्य व खाऊ वाटप
ठिकाण: जिल्हा परिषद शाळा दुधनी, भिवंडी, ठाणे
दिनांक: 13 एप्रिल 2025
कै. कु. सोनल भाऊसाहेब आंधळे हिच्या स्मरणार्थ तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या मित्र परिवाराकडून तसेच “नीड विकास संस्था,मुंबई “यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद शाळा दुधनी, केंद्र कुसापूर ता. भिवंडी जिल्हा ठाणे या शाळेला स्मार्ट टीव्ही, खेळाचे साहित्य (बॅट- बॉल, बॅडमिंटन रॅकेट, चेस व लुडो, फुटबॉल, आणि कॅरम बोर्ड इ.) व तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. शाळेची गरज ओळखून तेथील ९१ विद्यार्थ्यंना दिलेल्या वस्तूंचा शिक्षणासाठी नक्कीच उपयोग होईल.
सोनल आंधळे हिस समाजसेवेची आवड होती आणि तिची ही आवड तिच्या मित्र मैत्रिणींनी व कुटुंबाने मिळून जपली आहे. सोनल जरी सर्वांना सोडून गेली असली तरी तिच्या समाजसेवेच्या आवडीला व तिला कायम जिवंत ठेवण्यासाठी तिचे मित्र मैत्रिणी हा एक अनोखा प्रयत्न करत आहे. हि सर्व मंडळी संस्थे सोबत गेल्या वर्षी पासून संपर्कात राहून हे कार्य करत आहेत.
आम्ही संस्थेच्यावतीने विशाल, शुभम, अक्षय, ओंकार, निलया, संकेत, ऋग्वेद, प्रियांका, सनत, सुरज, उत्कर्ष, मितेश, कुणाल, वैष्णवी या सर्व मित्र मैत्रिणींचे व त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांचे देखील मनापासून आभार मानतो. तुम्ही हाती घेतलेले हे कार्य असेच पुढे देखील सुरु ठेवा अशी विनंती.
त्याचबरोबर शाळेतील शिक्षक व मुख्यध्यापक यांचे हि विशेष आभार ज्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पूर्ण होण्यासाठी सहकार्य केले.
अशा प्रकारचे उपक्रम आपणांस संस्थेच्या माध्यमातून राबवायचे असल्यास खालील क्रमांकांवर आपण संपर्क करू शकता.
सारिका – 9594666926
कमलेश – 9967884480
विजय – 9867230856
स्वप्नील – 9920042906
धन्यवाद!!
नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
न्यूट्रिशन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट